मध्यपूर्वेत युद्धाचे ढग! इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर इराण आक्रमक

तेहरान / जेरुसलेम :- इस्रायलने इराणवर हवाई हल्ला करत ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत मोठा लष्करी कारवायांचा प्रारंभ केला. या हल्ल्यात इराणच्या दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरून तीव्र इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले, “झायोनिस्ट राजवटीने मोठी चूक केली आहे. याचे परिणाम भयानक असतील. आमचे लष्कर पूर्णपणे तयार आहे आणि देवाच्या कृपेने आम्ही इस्रायलला नष्ट करू.” सैन्याला सर्वांचा पाठिंबा – खामेनी खामेनी यांनी आपल्या पोस्टमध्ये हेही स्पष्ट केलं की, "इराणचे सर्व अधिकारी आणि जनतेचा लष्कराला पूर्ण पाठिंबा आहे. आमचा शत्रू कोणत्याही प्रकारे वाचणार नाही. आमचा देश एकवटलेला आहे आणि आम्ही शहीदांचा बदला घेणारच.” मृत्यूमुखी पडलेले वरिष्ठ अधिकारी: जनरल हुसेन सलामी – IRGC (इन्कलाबी रक्षक दल) प्रमुख, तेहरानमधील IRGC मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात ठार. मेजर जनरल मोहम्मद बघेरी – इराणी सशस्त्र दलांचे प्रमुख व देशातील दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी, हवाई हल्ल्यात ठार. इस्रायलने केली मोठी लष्करी कारवाई: हल्ल्याचे ठिकाण: तेहरान येथील लष्करी तळ, IRGC मुख्यालय, आण्विक संशोधन केंद्रे ऑपरेशनचं नाव: Operation Rising Lion हल्ल्याचा हेतू: इराणच्या अणुऊर्जा क्षमतेवर प्रहार, IRGC नेत्यांचे उच्चभ्रू व लष्करी निर्णय घेणारे केंद्रे लक्ष्य मध्यपूर्वेत युद्धाचे ढग: खामेनी यांच्या वक्तव्यानंतर जगभरात चिंता वाढली आहे. झायोनिस्ट राजवटीला धडा शिकवण्याचा इराणचा निर्धार, आणि इस्रायलची पुढील टप्प्याची कारवाई, यामुळे पश्चिम आशिया पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे.