हिमाचलमध्ये ढगफुटीचा कहर, २ मृत्यू – २० जण बेपत्ता
.jpeg)
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी आणि
पूरपरिस्थिती निर्माण झाली असून कांगड्यातील मनुनी खाड परिसरात दोन
मृतदेह सापडले आहेत. तसेच, सुमारे १५ ते २० कामगार पुराच्या पाण्यात वाहून गेले
असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इंदिरा प्रियदर्शिनी जलविद्युत प्रकल्पाजवळील कामगार
वसाहतीवर अचानक पूर आल्याने ही घटना घडली. प्रकल्पाचे काम पावसामुळे
थांबवण्यात आले होते आणि कामगार विश्रांती घेत असताना नाल्यांमधून आलेल्या प्रचंड
पाण्याने त्यांना गाठले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून शोध व बचावकार्य सुरू आहे. काही स्थानिक कामगार सुरक्षित असल्याची माहिती आहे. जेपी नड्डा यांच्याकडून संवेदना केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. “मनुनी खडमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक कामगार वाहून गेल्याचे
दुःखद वृत्त मिळाले. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो,” असे त्यांनी ‘एक्स’ (X) या प्लॅटफॉर्मवर लिहिले. कुल्लू जिल्ह्यातही कहर कुल्लू जिल्ह्यातील सैंज, गडसा आणि रेहला बिहाल परिसरात ढगफुटीच्या तीन घटना नोंदवण्यात आल्या असून तीन जण बेपत्ता आहेत. मनालीजवळ बियास नदीला पूर आल्याने राष्ट्रीय महामार्गाचेही नुकसान झाले आहे. बंजरचे आमदार सुरिंदर शौरी यांनी सांगितले की, “सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
अनेक गावांत नुकसान झाले आहे. प्रशासन तातडीने उपाययोजना करत आहे.” हवामानाचा अंदाज आणि पावसाचे प्रमाण हवामान विभागाने चंबा, कांगडा, मंडी, शिमला आणि सिरमौर या जिल्ह्यांत पुराचा अलर्ट जारी केला आहे. मंगळवारी संध्याकाळपासून पडलेला
पाऊस (मिमीमध्ये):
- पालमपूर
– 145.5
- जोगिंदरनगर
– 113
- नाहन
– 99.8
- बैजनाथ
– 85
- पाओंटा
साहिब – 58.4
- धर्मशाळा
– 54.1
- कांगडा
– 44.4
- नरकंडा
– 41