भिगवणमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा कहर; बाजारपेठ, मंदिरे, महामार्ग जलमय
.jpeg)
भिगवन .संतोष सोनवणे
भिगवन येथे ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातल्या असून साधारण 200 मिलिमीटर च्या पुढे या पावसाची नोंद केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सकाळी आठ वाचता सुरू झालेला हा धुवाधार पाऊस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जोरदार बॅटिंग करत असल्याचे दिसून आले. यावेळी मुख्य बाजारपेठेत पाणी शिरले थोरात नगर येथील नागरिकांच्या लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले अनेक मैदानी नाले ही तुडुंब भरून वाहत होती अनेक मंदिरामध्ये पाणी शिरलं अनेक शेतकरी बंधारे या पावसाच्या पाण्याने फुटले तसेच पुणे सोलापूर नॅशनल हायवे वरती स्वामी चिंचोली येथे
या मोठ्या प्रमाणात पावसाचा पाण्याचा लोंडा आल्याने सुमारे तीन तीन तास पुणे सोलापूर हायवेवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली सुमारे 25 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले सायंकाळी सहा नंतर वाहतूक संत गतीने चालू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले