ढगफुटी आणि पुराने राज्याला तडाखा : ९१ मृत्यू, ३४ जण बेपत्ता
.jpeg)
शिमला :
हिमाचल प्रदेशात मान्सूनने भीषण तडाखा दिला असून, मुसळधार पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झाले आहे. ढगफुटी, पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना सतत घडत आहेत. आतापर्यंतच्या नुकसानीचा आढावा:
- एकूण
नुकसान: ७४९ कोटी रुपये
- मृत्यू: ९१ नागरिकांचा
दुर्दैवी मृत्यू
- जखमी: १३१ लोक गंभीर जखमी
- बेपत्ता: ३४ लोक बेपत्ता
- रस्ते
बंद: २०७ मार्ग अजूनही
वाहतुकीसाठी बंद
- वीजपुरवठा: १३२ ट्रान्सफॉर्मर बंद
- पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न: 812
योजनांवर परिणाम
- प्राणी
व पक्षी मृत्यू: २२,385 वाहून गेले
- घरे
उद्ध्वस्त: ४३२ घरे पूर्णपणे पडली
- घरे
बाधित: ९२8
घरांचे मोठे नुकसान
- गोशाळा:880 गोशाळा वाहून गेल्या
राज्य सरकारकडून मदत आणि बचाव कार्य सुरू असले तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे अडचणी येत आहेत. विशेषतः मंडी, शिमला आणि सिरमौर जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. हवामान खात्याचा इशारा: शिमला हवामान केंद्राने ११ व १२ जुलै रोजी मंडी, शिमला आणि सिरमौर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच, १३ ते १६ जुलै दरम्यान उना, हमीरपूर, बिलासपूर, कुल्लू, कांगडा, मंडी, शिमला, सोलन आणि सिरमौर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आणखी पावसाचे दिवस असल्याने परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना नद्या व डोंगराळ भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.