बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार

पुणे, ४ मेमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, सोमवार (५ मे) रोजी दुपारी १ वाजता mahresult.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. निकालासोबतच विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणांची माहिती आणि त्याची मुद्रित प्रतही मिळणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कु लाळ यांनी दिली आहे. राज्यात यंदा १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ही परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान पार पडली होती. सीआयसीएसई बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सीबीएसई बोर्डाचा निकाल अद्याप प्रतीक्षेत आहे.

गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ६ ते २० मेदरम्यान अर्ज

निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या अनिवार्य विषयांतील गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. हे अर्ज ६ मे ते २० मे या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याआधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे.

पुरवणी परीक्षेसाठी ७ मेपासून अर्ज प्रक्रिया सुरू

ज्यांचे काही विषयांत कमी गुण मिळाले आहेत किंवा श्रेणी सुधारायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ७ मेपासून सुरू होणार असून, त्यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. यासह विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२५