मुलांना सुद्धा दिवाळीसाठी शाळेला मोठी सुट्टी मिळते
.jpeg)
दिवाळी
आता पुढच्या महिन्यात सुरू होत आहे. दिवाळी म्हणजे वर्षातील सर्वात मोठा सण.
मुलांना सुद्धा दिवाळीसाठी शाळेला मोठी सुट्टी मिळते. दिवाळीत प्रत्येकाच्या घरी
लाडू, करंजी, विविध मिठाई आणि बरंच काही असतं. दिवाळी सुरू होण्याआधी
प्रत्येक व्यक्ती आपल्या घराची साफसफाई करते. घराची साफसफाई करताना बरीच मेहनत
लागते. शिवाय धूळ असल्याने केसही खराब होतात.
केस खराब
होण्याच्या समस्या आधीच जास्त आहेत. त्यात दिवाळीत केसांवर धूळ उडल्याने केस आणखी
जास्त रुक्ष होतात. त्यामुळे आज दिवाळीत साफसफाई करताना केसांची काळजी कशी घ्यायची
याची माहिती जाणून घेणार आहोत.
साफसफाई
करण्याआधी कधीच हेअर वॉश करू नका. त्यामुळे केस ओले राहतात. केस ओले असल्यावर
त्यावर धूळ लगेचच चिकटते. त्यामुळे केस धुवत असताना तुम्हाला • ही काळजी घेणे
गरजेचे आहे. अन्यथा याने केस आणखी जास्त खराब होतात. कारण ओल्या केसांना धूळ जास्त
वेळ चिकटून राहते. त्यामुळे जरी - इन्ही सकाळी आंघोळ केली असेल तरी देखील साफसफाई
करायची असल्यास केस ओले करू नका.
बऱ्याच
व्यक्तींना रात्री झोपताना केसांना तेल लावून - झोपण्याची सवय असते. मात्र जर
दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळीच साफसफाई करणार असाल तर केसांना तेल लावू नका. कारण केसांना तेल लावल्याने त्याने केसांवर धूळ
जास्त ओढली जाते. धुळीचे बारीक कण केसांवर चिकटतात. साफसफाई करताना केस कधीच मोकळे
ठेवू नका. केस मोकळे ठेवल्याने केसांवर
आणखी जास्त धूळ बसते. साफसफाई करताना केस मोकळे ठेवण्याची चूक अजिबात करू नका.
त्याने केसांमधील प्रोटीन सुद्धा कमी होते. केस तुटतात आणि सफेद देखील होऊ लागतात.
त्यामुळे साफसफाई करताना एकतर केस वरती बांधून ठेवा किंवा मग त्यांची वेणी बांधा.