मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर स्वागत

सोलापूर: तुळजापूर आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईहून खास विमानाने निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज शनिवारी सोलापूर विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, माजी खासदार श्री. सिद्धेश्वर स्वामी, महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त दिपाली काळे, विजय कबाडे, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री महोदयांनी सोलापूर विमानतळावर थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने तुळजापूरकडे मार्गस्थ झाले.