मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन
पंढरपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यामध्ये श्री विठ्ठल गर्भगृह, श्री रुक्मिणी गर्भगृह, श्री विठ्ठल चारखांबी व सोळखांबी, बाजीराव पडसाळी, महालक्ष्मी मंदिर आदी ठिकाणची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.