‘छावा’ छागया ...... पहिल्यादिवशी ग्रँड ओपनिंग!

मुंबई  : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. पाहिल्यादिवशी या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे पहिल्यादिवशी ग्रँड ओपनिंग मिळाले. चित्रपट रसिकांच्या मनावर छावा अधिराज्य गाजवत आहे. बहुचर्चित आणि लेझीम खेळावरून वादात अडकलेला विकी कौशल व रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे या सिनेमाचीच चर्चा आहे. चित्रपटातील एका सीनमुळे वाद झाल्याने रिलीजनंतर याला कसा प्रतिसाद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा पाहून प्रेक्षक भारावले आहेत, परिणामी चित्रपटाने ग्रँड ओपनिंग केली आहे. ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर पोस्ट करून चित्रपट कसा आहे, ते सांगत आहेत. विकी कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना यांच्यासह इतर कलाकारांचं काम जबरदस्त आहे. एकूणच हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला असल्याचे दिसून येते. अॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. मॅडोक फिल्म्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘छावा’ने भारतात पहिल्या दिवशी ३३.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर, जगभरात ५० कोटी रुपये कमावले आहेत. ‘ये छावा की दहाड है’ असं कॅप्शन देत निर्मात्यांनी आकडेवारी शेअर केली आहे.

‘छावा’चे बजेट किती?

लक्ष्मण उतेकर यांनी ४ वर्षे अभ्यास करून छत्रपती संभाजी महाराजांवरील हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनीही प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी तब्बल १३० कोटी रुपये खर्च केले आहेत. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच तो बजेटची रक्कम वसूल करेल, असं दिसत आहे. ‘छावा’मध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनित सिंह, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी, रोहीत पाठक या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. व्हेलेंटाइन डे च्या मूहूर्तावर विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षेत छावा चित्रपट रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी ‘छावा’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशीचे बॅाक्स अॅाफिस कलेक्शनही चांगले प्रकारे केले आहे. मात्र, छावा चित्रपटाची पहिल्या दिवशी म्हणजेच ओपनिंग डे चे कलेक्शन पाहता चित्रपटाने अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ च्या पहिल्या दिवशीचे बॅाक्स अॅाफिस कलेक्शनचे रिकार्ड मोडलेले नाही. मात्र, नुकतेच प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांचे रिकार्ड मोडण्यात छावाला यश आले आहे. शुक्रवारी  सायंकाळी सहा वाजेपर्यंत छावाने १९ कोटींची बंपर कमाई केली आहे. या आकडेवारीमध्ये वाढ होऊ शकते. प्रेक्षकांमध्ये छावाची क्रेझ पाहिला मिळत असून पुढच्या काही दिवसांमध्ये छावा बॅाक्स अॅाफिसवर किती गल्ला कमवतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या छावा चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होते.  अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही छावाने आघाडी घेतल्याचे दिसून आले होते. ‘छावा’ने इमर्जन्सी, आझाद, स्काय फोर्स, देवा या काही चित्रपटांचे पहिल्या दिवशीच्या कमाईचे रिकार्ड मोडले आहे. यामुळे आता आगामी दिवसांमध्ये छावाची बॅाक्स अॅाफिसवर वाटचाल कशी राहते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.