छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना; नकार दिल्याने महिलेवर कटरने हल्ला, २८० टाके

छत्रपती संभाजीनगर : शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. भावकीतीलच ३६ वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्यानंतर, नकार मिळताच १९ वर्षीय तरुणाने कटरने सपासप वार करत तिला गंभीर जखमी केले. या भीषण हल्ल्यानंतर महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्यावर २० टाके घालावे लागले आहेत.

काय घडले नेमके?

पीडितेच्या म्हणण्यानुसार, रविवारी (२ मार्च) दुपारी शेतात काम करत असताना आरोपी अभिषेक नवपुते (वय १९) याने तिला फोन करून शारीरिक संबंधांची मागणी केली. मात्र, तिने तत्काळ नकार दिला. त्यावर आरोपीने तू माझ्याबरोबर झोप, नाहीतर तुझ्या जावेशी माझं जुळवून दे’ अशी अघोरी मागणी केली. या वाक्याने संतप्त झालेल्या महिलेने फोन कट केला.

संध्याकाळी, शेतातील काम संपवून परत जात असताना अभिषेकने तिच्यावर अचानक हल्ला केला.
🔹 पाठीमागून वेणी ओढली आणि डोकं दगडावर आपटलं.
🔹 तिच्या तोंडावर, गळ्यावर कटरने वार केले.
🔹 मोठ्या दगडाने वार करून तिला रक्तबंबाळ केले.

या अमानुष हल्ल्यानंतर ती अर्धमृत अवस्थेत होती. शुद्धीवर आल्यानंतर तिला वेदनांनी ग्रासले होते.

० टाके, २२ हजारांचा फक्त टाक्यांचा खर्च!

🔹 पीडितेच्या शरीरावर २० टाके घालावे लागले.
🔹 तिच्या मानेपासून कमरेपर्यंत सव्वादोन फूट लांबीचा खोल वार आहे.
🔹 संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून, डॉक्टरांना गोधडीप्रमाणे शरीर शिवावे लागले.
🔹 टाके घालण्यासाठी लागणाऱ्या दोऱ्यांचा खर्च तब्बल २२ हजार रुपये आला.

घरची हलाखीची परिस्थिती; उपचारांसाठी मदतीची गरज

🔹 पीडितेचे पती आणि दोन लहान मुलं आहेत.
🔹 घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च उचलणे कठीण.
🔹 सासर आणि माहेर दोन्ही बाजूने आर्थिक मदतीची गरज आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक; मात्र कोणताही पश्चात्ताप नाही!

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी अभिषेक नवपुतेला ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप दिसत नाही, असे पोलिसांनी सांगितले. संपूर्ण समाज हादरला; कठोर कारवाईची मागणी या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे. समाजातील अनेक घटकांनी या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.