छांगुर बाबा प्रकरण: देशाला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र उघड

लखनऊ / उत्तर प्रदेश :
उत्तर प्रदेशातील बहुचर्चित बेकायदेशीर धर्मांतर रॅकेटचा प्रमुख जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा आणि त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन यांनी अटकेत असताना अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. एटीएसच्या (आतंकवादविरोधी पथक) रिमांडच्या पहिल्याच दिवशी या दोघांनी कबूल केले की, गेल्या १५ वर्षांपासून ते बेकायदेशीर धर्मांतर कामात सक्रिय होते. 
चौकशीत छांगुर बाबाने सांगितले की, त्याचे अनेक देशांशी थेट संबंध होते आणि हिंदू लोकसंख्या कमी करून भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे स्वप्न तो पाहत होता. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्याचे उघड झाले आहे. शंभर कोटींचा व्यवहार आणि आठ बँक खाती छांगुर बाबाने आठ वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली होती. बँक ऑफ बडोदा तसेच इतर बँकांतील खात्यांची चौकशी सुरू असून, यातून शंभर कोटींपेक्षा अधिक मालमत्तेच्या व्यवहारांची माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लव्ह जिहाद प्रशिक्षण आणि बक्षिसे छांगुर बाबा कथितपणे लव्ह जिहादमध्ये सहभागी तरुणांना मोठी बक्षिसे देत असे. त्यांना आलिशान हवेलीत प्रशिक्षण दिले जात होते. यासाठी परदेशातून निधी येत असल्याचेही प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. तक्रार आणि कारवाईचा इतिहास बलरामपूरचे रहिवासी वसीउद्दीन चौधरी यांनी २०२३ मध्ये पंतप्रधानांना पत्र लिहून छांगुर बाबाच्या रॅकेटविरोधात तक्रार केली होती. नागपूरच्या भारत प्रतिकार्थ सेवा संघाचे ईदुल इस्लाम आसी यांनी छांगुरला संघटनेचा उत्तर प्रदेश प्रमुख नेमले होते. या संबंधाने औपचारिक पत्रकही जारी झाले होते. वसीउद्दीन यांनी बांधलेली नीतू उर्फ नसरीनची इमारत काही दिवसांपूर्वी प्रशासनाने जमीनदोस्त केली होती. त्यावरून वाद उभा राहिल्यानंतर ही तक्रार झाली आणि अखेर पोलीस कारवाईने हा प्रकार उजेडात आला. आता पुढे काय?एटीएसने या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, परदेशी निधी आणि धर्मांतराचे नेटवर्क याची सखोल चौकशी सुरू केली आहे. छांगुर बाबाच्या ताब्यातून मिळालेल्या कागदपत्रांमुळे आणखी मोठ्या खुलाशांची शक्यता वर्तवली जात आहे.