एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल — १ ऑगस्ट २०२५पासून नवे दर लागू

नवी दिल्ली | देशातील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत आजपासून
मोठी कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या सिलिंडरवर तब्बल ₹३३.५० रुपयांची घट झाली असून १ ऑगस्ट २०२५ पासून ही नवी दररचना लागू होणार आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी
सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
शहरांनुसार नवीन व्यावसायिक सिलिंडर
दर:
- दिल्ली: ₹1,631.50
- मुंबई: ₹1,583.00
- कोलकाता: ₹1,735.50
- चेन्नई: ₹1,790.00
जुलै २०२५ मध्ये दिल्लीत हा दर ₹1,665 होता, तर मुंबईत ₹1,616.50.
म्हणजेच सलग दुसऱ्या महिन्यात ही कपात करण्यात आली आहे, जी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी दिलासा मानली जात आहे.
घरगुती सिलिंडरच्या किमतीत स्थैर्य:
- दिल्ली: ₹853.00
- मुंबई: ₹852.50
8 एप्रिल २०२५ पासून घरगुती गॅसच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला
नाही. घरगुती ग्राहकांसाठी यामुळे महागाईत स्थैर्य टिकून आहे, पण कोणताही दिलासा अद्याप मिळालेला नाही.
तेल कंपन्यांचे स्पष्टीकरण:
तेल कंपन्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही सुधारणा मागील आंतरराष्ट्रीय दरांमध्ये
झालेल्या घसरणीमुळे केली जात आहे. दर महिन्याच्या
सुरुवातीला गॅसच्या किमतींचा आढावा घेतला जातो.