चॅम्पियन्स ट्रॉफी विजय मिरवणुकीवर हल्ला, महूमध्ये तणावपूर्ण परिस्थिती!

इंदूर जिल्ह्यातील महू शहरात रविवारी रात्री भारतीय संघाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजय मिरवणुकी दरम्यान हिंसाचार उफाळला. रात्री 10.45 च्या सुमारास जामा मशिदीजवळ फटाके फोडले जात असताना वाद निर्माण झाला, जो पुढे मोठ्या दंगलमध्ये बदलला.

दंगल, दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ

हिंसक जमावाने एकमेकांवर दगडफेक केली तसेच अनेक वाहनांना आग लावण्यात आली. मुख्यतः पट्टी बाजार, मार्केट चौक, माणक चौक, सब्जी मार्केट, गफ्फार हॉटेल आणि कर्नॉट रोड परिसरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

पोलीस आणि लष्करी जवानांचा बंदोबस्त

हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी चार पोलीस ठाण्यांमधील पोलीस तैनात करण्यात आले असून, लाठीचार्ज व अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. महू उपविभागात लष्कराची छावणी असल्याने, काही भागांमध्ये लष्करी जवान गस्त घालताना दिसले.

 पोलीस अधिकाऱ्यांचे वक्तव्य

"हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यात आले असून, परिस्थिती सध्या स्थिर आहे. मात्र, प्रभावित भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे."
अनुराग, IG-इंदूर रेंज