पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यामुळे सोलापुरात जल्लोष....
.jpeg)
सोलापूर – पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा बदला घेत, भारतीय हवाई दलाने मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या
नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक केली. या कारवाईमुळे देशभरात राष्ट्रभक्तीची लाट
उसळली आहे. या पार्श्वभूमीवर, सोलापुरातील सात रस्ता परिसरात
देशप्रेमी अभिषेक सोनावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेढे वाटून जल्लोष साजरा
केला. "भारत माता की जय", "वंदे मातरम्"
अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नागरिकांमध्ये आनंद आणि देशभक्तीचा
उत्स्फूर्त जल्लोष पाहायला मिळाला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर – हिंदू
धर्मरक्षक शिवराज गायकवाड, देशप्रेमी अभिषेक सोनावणे,
राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष संजीव मोरे, पैलवान ज्योतिसिंग मन्सावाले, याकोब नवगिरे, मधुकर बनसोडे, सुरेश फरड, सुनील
काडे, भीमराज गोन्याल, प्रकाश कुनशीकर,
इम्मॅन्युएल सातालोलू, संदेश जमादार आदी
उपस्थित होते. सोलापुरातील नागरिकांनी भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करत दहशतवादाविरोधातील
या निर्णायक पावलाचं स्वागत केलं.