संगमेश्वरमध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर संसदेची स्थापना

सोलापूर: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात रिअर कट्टा हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमा  अंतर्गत रवर्षी १५ जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त  करिअर संसद स्थापना व शपथ विधी सोहळा केला जातो. त्या अनुषंगाने  संगमेश्वर कॉलेजमध्ये करिअर संसद २०२५-२६ ची स्थापना व शपथविधी करण्यात आली. या करिअर संसदेमध्ये मुख्यमंत्री आमदार सिद्धाराम गायकवाड, नियोजन मंत्री जय जाधव, कायदे व शिस्त पालन मंत्री बसवराज बिराजदार, सामान्य प्रशासन मंत्री ठेंगील सृष्टी, माहिती व प्रसारण मंत्री अभिषेक बर्वे, उद्योजकता विकास मंत्री राठोड आरती, रोजगार स्वंयरोजगार मंत्री डांगे यश, कौशल्य विकास मंत्री खारे विशाल, संसदीय कामकाज मंत्री हत्त्तुरे पल्लवी ,महिला व बाल विकास मंत्री वाघमारे श्रृती ,दस्य म्हणून टेल नाझिया,मशालकर नीलकंठ,आंबेवाले हर्षदा, छप्परबंद साबा यांची निवड करण्यात आली. करिअर संसद शपथविधी सोहळ्यासाठी सोलापूर महानगरपालिकेे उपआयुक्त मा.श्री.आशिष लोकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा : संधी व दिशा यासंदर्भात मार्गदर्शन  करताना विद्यार्थ्यांनी धेय्य निश्चित करून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. आजच्या आधुनिक युगामध्ये माहितीचे  कृत्रिम बुद्धिमत्ता AI  वापर करून सहज माहिती  मिळवून पुणे , मुंबईला न जाता सुद्धा अभ्यास करता येतो. युपीएससी व एमपीएससी मार्फत अनेक पदासाठी भरती केली जाते  या संधीचा लाभ घ्यावा असे म्हणाले.यावेळी ध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी ्राचार्य प्रा.डॉ.ऋतुराज बुवा यांनी नवनिर्वाचित विद्यार्थ्याना त्यांच्या पदाची शपथ देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सामाजिक शास्त्राचे अधिष्ठाता डॉ.वसंत कोरे, करिअर कट्टा जिल्हा समन्वयक प्रा.युवराज सोलापुरे, करिअर कट्ट्याचे महाविद्यालयीन समन्वयक प्रा. डॉ. शिवाजी मस्के, डॉ. राजकुमार मोहरकर, डॉ.महानंदा बगले,डॉ. वैशाली अचकनळी ,डॉ. शिला रामपूरे , डॉ.बजरंग मेटील डॉ. स्वरूपा किणगी -दामा , विध्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. ऋतुराज बुवा यांनी शुभेच्छा दिल्या.