विजयपूर जिल्ह्यातील कॅनरा बँक चोरीप्रकरणी: आणखी 12 जण अटक; 39 किलो सोने व 1.16 कोटी रोख जप्त

विजयपूर दिपक शिंत्रे

विजयपूर :- विजयपूर जिल्ह्याच्या बसवण बागेवाडी तालुक्यातील मनगोळी येथील कॅनरा बँक दरोडा प्रकरणात आणखी 12 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती बेलगाव उत्तर विभागाचे आयजीपी चेतनकुमार राठोड यांनी दिली. विजयपूर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणात यापूर्वीच तिघांना अटक करून सुमारे 10.75 कोटी रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले होते. आतापर्यंत एकूण 15 जणांच्या अटक करून सखोल तपास करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बालराज मणिकम यरेकुल, चंदनराज पिळ्ळई, गुंडू जोसेफ श्यामबाबू, पीटर चंद्रपाल, इजाज धारवाड, सुसैराज डॅनियल, बाबूराव मिरियाल, मोहम्मद असीफ कल्लूर, अनिल मिरियाल, मोहनकुमार, सुलेमान वेस्ली पलुकुरी आणि मरियादास गोना यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी हुबळीचे रहिवासी आहेत. याआधी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींसह एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे.  या आरोपींकडून एकूण 39 किलो  सोने, 1.16 कोटी रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने व अन्य मिळून सुमारे 39.26 कोटी रुपयांच्या मालमत्तेची जप्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विजयपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी , अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. शंकर मारीहाळ आणि रामणगौड हत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली. डीएसपी टी.एस. सुलपी, सुनील कांबळे, बल्लप्पा नंदगावी, सीपीआय रमेश अवजी, गुरूशांत दाश्याळ, अशोक चव्हाण, पीएसआय श्रीकांत कांबळे, अशोक नायक, देवराज उल्लागड्डी, बसवराज तिप्परेड्डी, राकेश बगली, सोमेश गेज्जी, विनोद दोडमणी, विनोद पुजारी, शिवानंद पाटील, यतीश के., श्रीमती नागरत्ना उप्पलदिन्नी यांच्यासह सुमारे 100 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या आठ विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती.