बुटकी गाय आणि म्हैस श्री सिद्धेश्वर कृषी अन औद्योगिक प्रदर्शनाचे विशेष आकर्षण…!*

श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवता असून यंदा प्रदर्शनाचे ५४ वे वर्षे आहे. या निमित्ताने होम मैदान येथे दी. २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२४ या ५ दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात ३०० स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने व स्मार्ट एक्स्पो ग्रुप च्या व्यवस्थापन अंतर्गत भरविण्यात येत आहे. तसेच कृषी संशोधन केंद्र, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र. रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर व मोहोळ विभाग, रेशीम खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण व राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप उद्योजक, नया उद्योजक, कृषी यांत्रिकीकरण फळ रोपवाटिकाधारक, साखर कारखाने यांच्या सहभागाने आयोजित केले जाणार आसल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीने धर्मराज काडादी आणि गुरुराज माळगे यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेस आर.एस पाटील, विजयकुमार बरबडे, एक्सपोचे सोमनाथ शेटे आदींची उपस्थिती होते.
दरम्यान, शेतकऱ्यांना शेतातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती, कृषी यांत्रिकीकरण, दुग्धोत्पादनः रेशीम पीक. मधुमिक्षका पालन, फलोत्पादन तसेच कृषी उद्योजक निविष्ठा, नवीन स्टार्टअप व्हर्टिकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे इत्यादी विषयी सविस्तर माहिती पोहचण्यास सुलभ होईल. या कृषी प्रदर्शनामध्ये सोलापूरचे शान असलेली खिलार बैल व गाय प्रदर्शित केले जाणार आहेत तसेच जगातील अत्यंत दुर्मिळ बुटकी देशी पुंगनूर जातीचे गायी प्रदर्शित केले जाणार आहेत. याकरीता इस्ट गोदावरी आंध्र प्रदेशातून शेतकरी सहभागी होणार आहेत.महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक, पुणे बाएक संख्या यांचेकडील शेतकयांनी स्वतः तयार केलेले अंदाजे ५०० प्रकारचे दुर्मिळ देशी बी-बियाणे प्रदर्शित करणार आहार तसेच शेतकऱ्याना विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत. दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत कैट शो व डॉग शो प्रदर्शन होणार असून यावेळी विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
याची सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० पर्यंत डॉग शो, दुपारी ४.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत कैट शो, सायंकाळी ६.०० वाजता डॉग अॅन्ड कैंट फैन्सी ड्रेस स्पर्धा दि. २३ डिसेंबर २०२४ राज्यस्तरीय देशी गाय, बैल प्रदर्शन स्पर्धा आयोजन व विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसंभ दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी पुष्प प्रदर्शना (फुलांचे प्रदर्शन) चे आयोजन. औद्योगिक प्रदर्शन सोलापूर जिल्ह्यामधीला कृषि व संलग्न, गारमेंट, टेक्सटाईल, टॉवेल इत्यादी उत्पादित मालाचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.