संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ अर्थसंकल्प देशाला उभारी देईल: पंतप्रधान मोदी यांचा विश्वास

दिल्ली : आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात झालीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच उद्याच्या बजेटबद्दल मोठे भाष्य केले. नरेंद्र मोदी हे म्हणाले की, गरीब, मध्यवर्ग समुदायावर लक्ष्मी प्रयत्न व्हावी. हा अर्थसंकल्प एक नवा विश्वास निर्माण करेल. या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा होईल. महिलांसाठी अत्यंत आवश्यक निर्णय या अधिवेशात होणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. म्हणजेच काय तर उद्याच्या बजेटमध्ये महिलांसाठी अनेक मोठ्या आणि कल्याणकारी योजना केंद्र सरकार आणू शकते. उद्याच्या बजेटकडे सर्वांच्या नजरा आहेत. पुढे बोलताना नरेंद्र मोदी हे म्हणाले की, 2047 मध्ये भारत विकसित झालेला असेल. जनतेने मला तिसऱ्यांदा संधी दिली. माझ्या तिसऱ्या कार्यकाळाचं हे पहिलं पूर्ण बजेट असल्याचे सांगताना नरेंद्र मोदी हे दिसले आहेत. महिलांसाठी अनेक महत्वाचे निर्णय होणार आहेत. तिसऱ्या कार्यकाळात सर्वांगिण विकासासाठी मिशन मोडवर आगेकूच आहे. हा अर्थसंकल्प एक नवा विश्वास निर्माण करणारा आहे, असे मोदींनी म्हटले. पुढे मोदी म्हणाले की, विकसित भारत मजबूत करण्यासाठी देशाचे युवक योगदान देतील. देशातील युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. विकसित भारत त्यांना बघायला मिळणार आहे. मला आशा आहे की, देशातील लोकांच्या आशा, आकांक्षा या बजेटच्या माध्यमातून पूर्ण होतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, नेहमीप्रमाणे या अधिवेशनातही अनेक ऐतिहासिक विधेयकांवर सभागृहात चर्चा केली जाईल.