सोलापूर शिक्षण विभागात पुन्हा लाचखोरी; वरिष्ठ सहाय्यक घनशाम म्हस्के २० हजार घेताना जाळ्यात

सोलापूर : सोलापूर जिल्हापरिषेदीतील लाचखोरीचे प्रकरण काही केल्या कमी होताना दिसत नाही. गुरुवारी सायंकाळी २० हजरांची लाच घेताना वरिष्ठ सहाय्यक अधिकारी रंगेहात सापडला. घनशाम अंकुश म्हस्के असेत्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. एक माध्यमिक शाळेतील शिक्षकाच्या निवड श्रेणी प्रस्ताव प्रकरणी घनशाम म्हस्के यांनी वरीष्ट वेतन श्रेणी मंजूर करण्यासाठी म्हस्के यांनी ४० हजारांची लाच मागितली होती. शेवटी ३५ हजारवर तडजोड झाली. या पैकी २० हजार रुपये स्वीकारताना म्हस्केला लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महाडिक यांच्या पथकाने हि कारवाई केली.