विजयपूरात युवकाचा मृतदेह हत्या केलेल्या अवस्थेत आढळला
.jpeg)
विजयपूर. :- गुप्तांग, गळा व इतर भागांवर जखमा असलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. ही घटना विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील अरकेरी गावाजवळ घडली असून अरकेरी गावाजवळील कराडदोड्डी रस्त्याच्या बाजूला हा मृतदेह आढळला. बिलनसिद्ध दुंडप्पा ओडेयर (वय 33) असे मृत युवकाचे नाव असून तो अरकेरी गावाचा रहिवासी होता.बिलनसिद्ध याची काही अज्ञात व्यक्तींनी हत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.घटनेच्या स्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक शंकर मारीहाळ. ग्रामीण डीएसपी टी.एस. सुलपी पोलीसांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे.पोलीस प्राथमिक माहिती गोळा करत आहेत.घटनेच्या ठिकाणी युवकाच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला.ही घटना विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलीस तपास पुढे सुरू आहे.