बॉबी देओल साकारणार औरंगजेब
.jpeg)
मुंबई: बॉलिवूड मध्ये
लॉर्ड बॉबी म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता बॉबी देओल आगामी चित्रपटात औगंगजेबच्या
भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता बॉबी देओल आज त्याचा 56वा वाढदिवस साजरा करत आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या नवीन चित्रपटातील लूक समोर आला आहे. बॉबी देओल
‘हरि हर वीरा मल्लू’ या तेलुगु चित्रपटात भूमिका साकारणार असून, या सिनेमातील त्याचा लूक समोर आला आहे. बॉबीच्या
वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचा लूक शेअर केला आहे.
या चित्रपटामध्ये तो ओरंगजेबची भूमिका साकारत आहे. ‘हरि हर वीरा मल्लू’ हा चित्रपट
वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट तेलुगुसह विविध भाषांमध्ये
रिलीज होईल. ‘हरि हर वीरा मल्लू’ हा चित्रपट 28 मार्चला मोठ्या पडद्यावर रिलीज
होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश जगरलामुडी हे असून, या
चित्रपटात बॉबी देओलसोबत पवन कल्याण, निधी अग्रवाल, अनुपम खेर या कलाकारांचीही प्रमुख भूमिका आहे.