काँगोमध्ये नाव दुर्घटना; २५ जणांचा मृत्यू, फुटबॉल खेळाडूंना जीव गमवावा लागला

किन्शासा (काँगो) : काँगोमध्ये मोठी नाव दुर्घटना घडली असून, या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मृतांमध्ये फुटबॉल खेळाडूंचाही समावेश असल्याचे समजते. एपी प्रेसच्या वृत्तानुसार, प्रांतीय प्रवक्ते एलेक्सिस मपुतु यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री माई-न्डोम्बे प्रांतातील मुशी शहरात फुटबॉल सामना खेळल्यानंतर परतणाऱ्या खेळाडूंची नाव क्वा नदीत उलटली. बचावकार्य सुरू, ३० जण वाचले मुशीचे स्थानिक अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी सांगितले की, या अपघातात ३० लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, अजूनही काही प्रवासी बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध घेतला जात आहे. नाव दुर्घटनांची कारणंकाँगोमध्ये अशा प्रकारच्या नाव दुर्घटना नेहमीच घडतात. यामागील काही महत्त्वाची कारणं
पुढीलप्रमाणे आहेत –
- वाहतुकीची
मर्यादित साधनं: काँगोमध्ये अनेक भागांत रस्ते आणि वाहतुकीची इतर सुविधा
नसल्याने स्थानिक नागरिक जलमार्गांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
- गर्दी
आणि सुरक्षेचा अभाव: अधिक प्रवासी भरल्यामुळे आणि लाईफ जॅकेट नसल्याने दुर्घटनांचे
प्रमाण वाढते.
- निसर्गाची
लहरी स्थिती: वेगवान वादळं आणि अन्य प्राकृतिक संकटांमुळे जलवाहतुकीचा धोका
अधिक वाढतो.
जहाज सुरक्षा – एक गंभीर प्रश्न
या दुर्घटनेनंतर जलवाहतुकीतील
सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काँगोमध्ये नद्यांवर अवलंबून असणाऱ्या
नागरिकांसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने
कडक नियम आणि उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते.