अजित पवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, मराठा महासंघाचे आंदोलन

जालना : मस्साजोग आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मराठा महासंघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला जालना शहारातील भोकरदन नाका तेथे सोमवारी (ता.२०) काळे झेंडे दाखवले.मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिस कोठडीत झालेला मृत्यू या दोन्ही प्रकरणीच्या पार्श्वभूमीवर अखिल मराठा महासंघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध केले.अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले याचा आम्ही निषेध करण्यात धनंजय मुंडे त्याच पक्षाचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाले. याचा निषेध म्हणुन हे आंदोलन भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले.अजित पवार यांनी स्वतः पालकमंत्री पद न घेता दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्यांना पालकमंत्री पद द्यायला हवे होते.