भाजप - संघाने सुरु केले मिशन मनपा

थेट संदेश नेतृत्वाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आमचे सरकार राज्यात लवकारत लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक महापालिका, नगरपालिकांचा कारभार सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या हाती सोपवण्यात घेण्याची मागणी करत आहेत. शिवसेनेने (ठाकरे) सातत्याने दावा केला आहे की, भाजप व शिवसेना (शिंदे) मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. राज्यातील महापालिका आपल्या हातून निसटतील, याची त्यांना मिती आहे. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपसाठी मोर्चेबांधणी करण्यास सज्ज झाला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने महायुतीविरुध्द महाविकास आघाडी अशी लढत होती. यावेळी आरएसएसने युतीसाठी काम केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र बहुरंगी असतील. यावेळी संघ केवळ भाजपासाठी काम करताना दिसेल.

युती व आघाडीमधील अनेक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मविआमध्ये शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस वेगवेगळे लढणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच चित्र महायुतीतदेखील पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने भाजपने अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यात आता त्यांना संघाचाही हातभार मिळणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. भाजपने आरएसएसच्या माध्यमातून त्यांच्या आघाडीच्या सर्व संघटनांमध्ये समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे. सर्व माध्यमे, संघटना सक्रिय केल्या आहेत. नुकतीच यासंदर्भात भाईंदरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. संघ व त्यांच्याशी संबंधित संघटना, प्रामुख्याने हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर एका कार्यकत्यांन सांगितले की, भाजप व संघाने एकत्र काम केल्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला मोठे यश मिळाले. त्यामुळे असाच समन्वय पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठेवावा लागणार आहे. कोणतेही वाद किंवा मतभेद निवडणुकीच्या दृष्टीने संघटनेला परवडणारे नाहीत, असा आला आहे. राज्यात आता बृहन्मुंबई महानगरपालिकेसह एकूण २७ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यासह इचलकरंजी व जालन्यात दोन नव्याने महामंडळे स्थापन झाली आहेत, तीदेखील पहिल्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधीच्या महायुतीच्या (एकनाथ शिंदे) सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाहीत, असा आरोप विरोधकांनी सातत्याने केला आहे. विरोधक आजही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यांच्याकडून तयारी सुरू झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयी एका मुलाखतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्च किंवा एप्रिल महिन्यात होण्याची अपेक्षा आहे. तर या निवडणुकीतील आरएसएसच्या सहभागाबद्दल ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत संघ व संबंधित ३५ आघाडीच्या संघटनांची भूमिका महत्त्वाची होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजप, आरएसएस व त्यांच्या सर्व आघाडीच्या संघटनांबरोबर मिळून काम करतील. संघ व त्यांच्याशी संबंधित संघटनांचा आम्हाला सक्रिय पाठिंबा मिळेल. महाराष्ट्रातील २८८ पैकी १५८ जागा लढवणाऱ्या भाजपने १३२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक घटकांबरोबर युती करणार नाही, असे स्पष्ट केले होते.