दिल्लीत भाजप बहुमताकडे, आम आदमी पक्षाला मोठा फटका

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू केली आहे. 70 पैकी 42 जागांवर भाजप आघाडीवर आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत भाजप सुरुवातीपासूनच मजबूत स्थितीत दिसत आहे.
भाजपचा विजय निश्चित?
मतदानानंतर अनेक एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, भाजपचा बहुमताकडे प्रवास सुरू आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचा प्रभाव पूर्णतः कमी झाला आहे. मागील निवडणुकीप्रमाणेच काँग्रेस यावेळीही एकही जागा जिंकू शकली नाही.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे ट्रेड्स पाहता भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू आहे. कार्यकर्ते ढोल-ताशांच्या गजरात नाचत असून मिठाई वाटप सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या पोस्टर घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.