वाढदिवसाचं आमिष... अन् पंधरा दिवसांची कैद – सोलापुरात महिलेवर अत्याचार

सोलापुरात वाढदिवसानिमित्त कपडे खरेदी करण्याचं आमिष दाखवून एका महिलेला बोलावून मठात डांबून जबरदस्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेने कर्नाटकातील शहाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, ही तक्रार सोलापूरच्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून 22 जुलैच्या रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला.

आरोपीचे नाव:
शंकर हिरालाल लोखंडे (वय 45, रा. रामवाडी, सोलापूर)
त्याच्यावर BNS कलम 64(2)(M), 127(4)69, 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

घटनाक्रम:
मार्च 2025 मध्ये आरोपीने पीडित महिलेला वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापुरात कपडे खरेदीसाठी बोलावले. 5 मार्चला आरोपीने तिला सोलापुरात आणून एका मठात भाड्याने खोली घेऊन डांबून ठेवले. त्यानंतर त्याने तुझ्याशी लग्न करीन, असे सांगत वारंवार बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास जान मारण्याची धमकी दिली.

तक्रार नोंदवण्यास उशीर: पीडित महिला आपल्याच गावात परतल्यावर 21 जुलै रोजी शहाबाद पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. घटना सोलापुरात घडल्याने गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

तपास: या प्रकरणाचा तपास महिला उपनिरीक्षक बोधे करीत आहेत. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.