बिहार निवडणुका २०२५ | गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या रिंगणात? नेत्यांसोबतच्या भेटीनं रंगल्या चर्चा
पाटणा | ऑक्टोबर २०२५
बिहार विधानसभा निवडणुका जवळ येत असताना राजकीय वर्तुळात नव्या
चेहऱ्यांची चर्चा रंगू लागली आहे. प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर
(Maithili Thakur) भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात
उतरू शकतात, अशी चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.
ही चर्चा तेव्हाच सुरु झाली जेव्हा मैथिली ठाकूर यांनी भारतीय
जनता पक्षाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची
भेट घेतली. या भेटीत तिचे वडील देखील उपस्थित होते.
नेत्यांसोबतचा
फोटो चर्चेत
विनोद तावडे यांनी रविवारी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर मैथिली
ठाकूरसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले —
“लालू प्रसाद यादव सत्तेत आल्यावर बिहार
सोडून गेलेल्या कुटुंबातील मुलगी मैथिली ठाकूर, बिहारचा
बदलता चेहरा पाहून आता परत येऊ इच्छिते.”
तावडे पुढे म्हणाले,
“गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि मी
मैथिलीला बिहारच्या जनतेसाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. बिहारचा सामान्य माणूस
तिच्याकडून विकासासाठी योगदान अपेक्षित ठेवतो.”
या पोस्टनंतर मैथिली ठाकूरच्या राजकीय प्रवेशाची चर्चा
जोर धरू लागली आहे.
मैथिली
ठाकूरची प्रतिक्रिया
मैथिली ठाकूरनेही तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली
आहे.
ती म्हणाली —
“बिहारसाठी मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांशी
होणारा प्रत्येक संवाद मला दूरदृष्टी आणि सेवेच्या शक्तीची आठवण करून देतो. मी
त्यांचा मनापासून आदर करते.”
जरी मैथिली ठाकूरने थेट राजकारणात उतरण्याची घोषणा केलेली
नसली, तरी तिच्या या वक्तव्याने ती भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे
संकेत दिले आहेत.
कोण
आहे मैथिली ठाकूर?
- मूळगाव : बेनीपट्टी, मधुबनी (बिहार)
- वय : २५ वर्षे (जुलै
२०२५)
- निवडणूक आयोगाने
मैथिली ठाकूरची बिहार स्टेट आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे.
- २०२१ मध्ये तिला संगीत
नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार मिळाला.
- ती मैथिली, भोजपुरी आणि हिंदी भाषांमध्ये
लोकसंगीत गाते.
- इंडियन आयडल आणि सा
रे गा मा सारख्या रिअॅलिटी शोमध्ये ती झळकली आहे.
तिने आपल्या आजोबा आणि वडिलांकडून हिंदुस्थानी शास्त्रीय
संगीत, हार्मोनियम आणि तबल्याचे प्रशिक्षण घेतले आहे.
राजकीय
पार्श्वभूमी आणि अंदाज
राजकीय विश्लेषकांच्या मते, मैथिली ठाकूर ही
बिहारच्या तरुण आणि सांस्कृतिक मतदारांमध्ये लोकप्रिय चेहरा आहे.
भाजपकडून तिला पक्षात सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जर तिने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर
ती मधुबनी किंवा दरभंगा मतदारसंघातून उमेदवार असू शकते.