"शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खरीप पीकविम्याची रक्कम खात्यात थेट जमा होणार"

सोलापूर  एप्रिल २५, २०२५ :
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी २ लाख १० हजार ६६३ शेतकऱ्यांना एकूण
२ २ कोटी २० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. ही रक्कम पुढील आठवड्यापासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून देण्यात आली आहे. पावसामुळे झालेले नुकसान आणि त्याची भरपाई खरीप हंगामात हस्त नक्षत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ७.३३ लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत विमा घेतला होता, त्यातील सुमारे १.२५ लाख शेतकऱ्यांनी नुकसान कळवले होते. त्यानुसार कंपन्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित केली. या तालुक्यांना मिळणार सर्वाधिक लाभ पिकांचे नुकसान प्रामुख्याने बार्शी, अक्कलकोट, माढा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये झाले आहे. सोयाबीन, उडीद, तूर, मका, बाजरी, खरीप ज्वारी ही पिके प्रभावित झाली होती. विमा हप्त्याच्या विलंबामुळे अडचण शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास राज्य सरकारच्या विमा हप्त्याच्या विलंबाने अडथळा निर्माण झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने आपली रक्कम भरल्यामुळे विमा कंपनीने भरपाई वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा ही नुकसानभरपाई थेट खात्यावर जमा होणार असून, येणाऱ्या रबी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी ही बातमी उत्साहवर्धक ठरणार आहे.