शेअर बाजारात मोठी घसरण ; गुंतवणूकदारांचे नुकसान

मुंबई : कमकुवत कार्पोरेट कमाई, अमेरिकेच्या कर लावण्याच्या इशाऱ्याने
निर्माण झालेली ट्रेड वॉरची भीती आदी घटक
शेअर बाजारासाठी मोठ्या नुकसानीचे ठरले आहेत. दरम्यान, आज
बुधवारी सलग सहाव्या सत्रात भारतीय शेअर धडाम झाला. सुरुवातीच्या व्यवहारात
सेन्सेक्स ७५० हून अधिक अंकांनी घसरला. तर निफ्टी ५० निर्देशांक २२८ अंकांनी खाली
आला. त्यानंतर सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्सची घसरण काही प्रमाणात
कमी झाली होती. मुख्यतः निफ्टी मिड आणि स्मॉलकॅप शेअर्सना विक्रीचा सर्वाधिक फटका
बसला आहे. क्षेत्रीय पातळीवर निफ्टी बँक, ऑटो, मेटल, फार्मा, रियल्टी,
कन्द्रयूमर ड्युराबेल्स हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले आहेत. निफ्टी
स्मॉलकॅप १०० निर्देशांक १.२ टक्के घसरला आहे. निफ्टी मिडकॅप १०० देखील खाली आला
आहे. बीएसई मिडकॅप १.४ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक सुमारे २ टक्के घसरला आहे.