1 जून 2025 पासून आर्थिक नियमांमध्ये मोठे बदल – जाणून घ्या तुमच्यावर काय परिणाम होणार!

1 जून २०२५ पासून आर्थिक आणि तांत्रिक प्रणालीमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार असून, हे बदल सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर आणि मासिक बजेटवर थेट परिणाम करणारे ठरणार आहेत.

EPFO 3.0 – PF काढणे आणखी सोपे आणि जलद:
Employees' Provident Fund Organisation (EPFO) जूनपासून EPFO 3.0 प्रणाली लागू करत आहे.

  • सदस्य UPI किंवा ATM च्या माध्यमातून पीएफ रक्कम त्वरित काढू शकतील.
  • खाते शिल्लक UPI अ‍ॅप्सवर थेट पाहता येईल.
  • निधी सहजपणे पसंतीच्या बँक खात्यात ट्रान्सफर करता येईल.

आधार अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ जून:

  • ऑनलाइन अपडेटसाठी २५ तर आधार केंद्रावर ५० शुल्क आकारले जाईल.
  • ही अंतिम मुदत चुकवू नये, अन्यथा अनेक सेवांवर परिणाम होऊ शकतो.

क्रेडिट कार्ड धोरणांमध्ये बदल:

  • HDFC Tata Neu Infinity आणि Tata Neu Plus कार्डसाठी लाउंज ऍक्सेस व्हाउचर व्यवहारांच्या आधारावर मिळतील.
  • Axis Bank REWARD कार्डच्या पॉइंट मिळवण्याच्या नियमांमध्ये सुधारणा.
  • Kotak Mahindra Bank ने देखील काही अटींमध्ये बदल केल्याची शक्यता आहे.

FD व्याजदरांमध्ये बदलाची शक्यता:

  • सध्याचे दर ६.५% ते ७.५% दरम्यान आहेत.
  • रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर बदलाचा थेट परिणाम FD व्याजदरांवर होईल.

TDS प्रमाणपत्र (Form 16) मिळवण्याची अंतिम तारीख – १५ जून:

  • नियोक्त्यांनी १५ जूनपूर्वी कर्मचार्‍यांना TDS प्रमाणपत्र द्यावे.
  • आयकर रिटर्नसाठी हे अत्यंत आवश्यक आहे.

UPI व्यवहारात प्राप्तकर्त्याचे नाव स्पष्ट दिसणार – ३० जूनपासून:

  • QR कोड फसवणुकीपासून संरक्षण मिळेल.
  • व्यवहार अधिक पारदर्शक व सुरक्षित होतील.

SEBI कडून म्युच्युअल फंड कट-ऑफ वेळांमध्ये बदल:

  • ऑफलाइन व्यवहार: दुपारी ३ वाजेपर्यंत
  • ऑनलाइन व्यवहार: संध्याकाळी ७ वाजेपर्यंत

ATM व्यवहार शुल्कात वाढ होण्याची शक्यता:

  • फ्री ट्रान्झॅक्शनची मर्यादा ओलांडल्यानंतर अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
  • वारंवार ATM वापरणाऱ्यांवर याचा परिणाम होईल.

युटिलिटी बिल पेमेंटवर अतिरिक्त शुल्क:

  • काही बँका क्रेडिट कार्डद्वारे वीज, पाणी यांसारख्या युटिलिटी बिलांवर अतिरिक्त शुल्क लावू शकतात.
  • ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.