UPI व्यवहारात मोठा बदल: आता दिसेल बँकेत नोंदणीकृत नाव

नवी दिल्ली: भारतात डिजिटल व्यवहाराचा वापर वेगाने वाढत असून, त्यासोबतच UPI (Unified Payments Interface) प्लॅटफॉर्मवरील फ्रॉडही वाढत आहेत. यावर उपाय म्हणून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारासाठी एक महत्त्वपूर्ण नियम लागू केला आहे.

काय आहे नवीन नियम?

30 जून 2025 पासून, यूपीआयद्वारे व्यवहार करताना सामोरच्या व्यक्तीचे नाव तेच दिसेल जे बँक रेकॉर्डमध्ये रजिस्टर आहे.
उदाहरणार्थ, तुम्ही Google Pay, PhonePe किंवा Paytm वापरून पैसे पाठवत असाल, तर रिसिव्हरच्या फोनमध्ये सेव्ह केलेले नाव नाही, तर बँकेमध्ये रजिस्टर केलेले अधिकृत नाव स्क्रीनवर दिसेल.

कोणत्या ट्रान्झॅक्शनसाठी लागू?

हा नियम दोन प्रकारच्या ट्रान्झॅक्शनसाठी लागू होणार आहे:

1.       P2P (Person to Person): एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवताना त्याचे बँक नाव दिसेल.

2.      P2M (Person to Merchant): दुकान, हॉटेल यासारख्या व्यापाऱ्यांना पैसे देताना त्यांचेही नोंदणीकृत नाव स्पष्टपणे दिसेल.

काय आहे यामागचा उद्देश?

  • फसवणूक टाळणे: बनावट QR कोड किंवा चुकीच्या नावाच्या सहाय्याने होणाऱ्या फसवणुकीत घट होईल.
  • पेमेंटची खात्री: पैसे पाठवणाऱ्याला खात्री मिळेल की व्यवहार योग्य व्यक्तीकडे चालला आहे.
  • डिजिटल पेमेंटची सुरक्षितता वाढवणे.

यामुळे काय होणार फायदा?

  • UPI व्यवहारात पारदर्शकता: प्रत्येक व्यवहारात नाव स्पष्ट झाल्यामुळे गोंधळ आणि चुकांची शक्यता कमी.
  • फसवणुकीवर नियंत्रण: बनावट नावाने QR कोड स्कॅन करून पैसे घेतल्याच्या घटना कमी होतील.
  • ग्राहकांचा विश्वास वाढणार.