स्थापत्य २०२५ प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन; २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान नॉर्थकोट मैदानावर आयोजन

सोलापूर: असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सतर्फे सोलापुरात
२१ते २३ फेब्रुवारी दरम्यान नॉर्थकोट
प्रशालेच्या मैदानावर भरणाऱ्या 'स्थापत्य २०२५' या बांधकाम साहित्य व अंतर्गत सजावट विषयक प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन
असोसिएशनचे अध्यक्ष अभियंता प्रशांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
'स्थापत्य २०२५' या स्थापत्य प्रदर्शनाचे
प्रायोजकत्व मेटारोल इस्पात प्रा. लि. जालना यांनी घेतले आहे.यावेळी असोसिएशनचे
अध्यक्ष मोरे म्हणाले, नव्याने
घर बांधू इच्छिणाऱ्यांसाठी तसेच घराच्या अंतर्गत सजावटीसाठीची अतिशय उपयुक्त आणि
आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती स्थापत्य प्रदर्शनातून नियमितपणे देण्यात येते. या
प्रदर्शनात जागा विक्रीचे विविध प्रकल्प, प्रमोटर आणि बिल्डर,
गृह कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था, सिमेंट
कंपन्या, कन्स्ट्रक्शन केमिकल्स, स्टील,
प्लंबिंग आणि सॅनेटरी वेअर, इलेक्ट्रिक
मटेरियल, बांधकामास लागणारी अत्याधुनिक यंत्रे आणि उपकरणे,
दरवाजे आणि खिडक्या, रूफिंग मटेरियल, टाईल्स, घरातील अंतर्गत सजावट, फर्निचर, लँडस्केपिंग असे एकूण ७० स्टॉल्स आहेत. या
स्टॉल्सच्या माध्यमातून सोलापूरकरांना याबाबतची माहिती देण्यात येणार आहे.
स्थापत्य २०२५ हे प्रदर्शन तीन दिवस सकाळी १० ते
रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असून सोलापूरकरांनी या प्रदर्शनास
भेट द्यावी आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे
आवाहन असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सचे सचिव अभियंता मनोहर लोमटे
यांनी केले. याप्रसंगी असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सचे उपाध्यक्ष अभियंता भगवान जाधव, खजिनदार संतोषकुमार
बायस, माजी अध्यक्ष गोकुळ चितारी,
सुनील फुरडे, किरण कदम, प्रकाश तोरवी, अजय पाटील, इफ्तेकार नदाफ, विनायक जोशी, मनोज म्हेत्रस, अमोल मेहता, जनरल बॉडी मेंबर श्रीनिवास इप्पाकायल,
सूर्यकांत बिराजदार, राजेश जाधव, इरेशा आलुरे, युगंधर शिंदे, नवनाथ
निचरे, दत्तात्रय घोडके, अल्ट्राटेक
सिमेंट कंपनीचे टेरिटरी ऑफिसर बाळकृष्ण कुलकर्णी, सचिन भिसे
आदी उपस्थित होते.
**प्रदर्शनातून
होणार पर्यावरण जागृती *
स्थापत्य २०२५ चे घोषवाक्य 'सेव्ह एंन्व्हॉर्मेंट फॉर ग्रीन फ्युचर'
हे आहे. या विषयाची माहिती देणारा स्टॉलदेखील या प्रदर्शनात असणार
आहे. स्थापत्य प्रदर्शनाच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीही करण्यात येणार आहे,
असे असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल
इंजिनिअर्सचे अध्यक्ष अभियंता प्रशांत मोरे यांनी सांगितले.