"तुषार" टेलिफिल्मला सर्वोत्कृष्ट टेलि फिल्म पुरस्कार

विजयपुर: विजयपूरातील अभिनेता दिग्दर्शक विश्वप्रकाश टी मलगोंड
दिग्दर्शित तुषार टेलिफिल्मला "चित्र
संथे" द्वारे आयोजित चित्र संथे चित्रपट महोत्सवात "सर्वोत्कृष्ट कन्नड
टेलिफिल्म पुरस्कार" देण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेता श्रेयस के मंजू आणि
चित्र संथेच्या संपादक गिरीश व्ही गौडा यांच्या हस्ते बेंगळुरू येथील हायदेही पार्क हॉटेल येथे
झालेल्या चित्रपट महोत्सवात विश्वप्रकाश टी मलगोंड यांना हा पुरस्कार प्रदान
करण्यात आला. निर्माते गंडुगली के मंजू, अभिनेत्री अंबाली भारती, प्रज्ञा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.
महेश अरविंद, अभिनेत्री नंदिनी रमय्या या चित्रपट महोत्सवाचा
व्यासपीठावर उपस्थित होते.