बेंगळुरूतील चेंगराचेंगरी अहवाल जाहीर – आरसीबीवर गंभीर आरोप!
.jpeg)
बेंगळुरू | १७ जुलै २०२५ –
आयपीएलमध्ये विजयी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाच्या विजयानंतर शहरात भरवण्यात आलेल्या जल्लोष कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीचा
तपशीलवार अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. या अहवालात अनेक गंभीर निष्काळजीपणा व
नियोजनातील त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत. RCB संघ, केएससीए
(Karnataka State Cricket Association) आणि डीएनए
एंटरटेनमेंट नेटवर्क यांनी या कार्यक्रमासाठी कोणतीही कायदेशीर मंजुरी घेतली
नव्हती, असे स्पष्ट झाले आहे. स्टेडियमबाहेर केवळ ७९ पोलिस
तैनात होते, जे हजारोंच्या गर्दीसाठी पुरेसे नव्हते. याशिवाय,
रुग्णवाहिका व्यवस्थेचा अभाव, डिजिटल
तिकिटांऐवजी प्रत्यक्ष तिकिटांचा वापर, आणि गर्दी नियंत्रणात
फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. गर्दीचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने अनेकांना
आपले प्राण गमवावे लागले. कर्नाटक उच्च न्यायालयाने सरकारकडून सादर
करण्यात आलेल्या "अहवाल गोपनीय ठेवण्याच्या याचिकेला" नकार दिला असून, हा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, RCB,
KSCA आणि DNA नेटवर्क यांच्याविरुद्ध एफआयआर
दाखल करण्यात आले आहेत. याचबरोबर, बेंगळुरू पोलिस आयुक्तांसह
पाच पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत की, हा अहवाल संबंधित संस्थांबरोबर शेअर करून चौकशीची कार्यवाही सीआयडीमार्फत
पुढे सुरू ठेवावी.