बीड अमानुष मारहाण प्रकरणात भाजप पदाधिकारी सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल

बीड : शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी भाजप पदाधिकारी सतीश भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. आरोपी सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी याबाबत प्रतिक्रिया देत, "सतीश भोसले हा माझा कार्यकर्ता असला तरी कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. त्याच्या विरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी कारवाई करावी," असे स्पष्ट केले होते. पोलिसांची कारवाई सुरू या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔹 आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत.
🔹 मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

व्हायरल व्हिडिओमुळे संतापाची लाट सोशल मीडियावर हा अमानुष मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव वाढला होता.

🔹 या घटनेमुळे बीड आणि शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
🔹 पोलिसांकडून लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे.