ढोल वाजवून, भंडारा उधळून पालकमंत्र्यांचे स्वागत

सोलापूर:  ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे धनगर समाजाच्यावतीने पारंपारिक गजीढोल वाजवून तसेच पवित्र भंडाऱ्यांची उधळण करुन जोरदार स्वागत करण्यात आले. पालकमंत्री गोरे सोलापूर दौऱ्यावर येणार म्हटल्यानंतर काही समाज संघटनेच्यावतीने त्यांना समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि काही प्रश्नांची आठवण करुन देत त्याची सोडवणूक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच समाजाचे पाठबळ कायम मंत्री गोरे यांच्या पाठिशी राहील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. पारंपारिक घोंगडी आणि काठी देवून त्यांचा समाज बांधवांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल कारंडे, माऊली हळणवकर, प्रकाश घोडके, महेश गुंडे, बबलू गुंडे, यतीराज होनमाने, आप्पासाहेब देशमुख, नागेश वाघमोडे, अभिजित देवकाते, आप्पा पुजारी आदी उपस्थित होते.