अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनात शुक्रवारी रंगणार बालमहोत्सव

अहिल्या नगर : अखिल भारतीय नाट्य परिषदेने 100वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनानिमित्त शुक्रवारी 24 जानेवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत बालमहोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती विभागीय संमेलन प्रमुख क्षितीज झावरे व नाट्य परिषदेच्या उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रसाद बेडेकर यांनी दिली.नाट्यसंमेलनाच्या यजमानपदामुळे नगरच्या रंगकर्मी, तसेच नाट्य रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. येत्या दि. 26 व 27 रोजी संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत होणार्‍या नाट्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. बाल महोत्सव सावेडी रोडवरील माऊली सभागृहात होणार आहे.  तब्बल 22 वर्षांनंतर शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होत आहे. प्रा. मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार सिने नाट्यसृष्टीला देणार्‍या नगर शहरात या संमेलनामुळे उत्साहाचे वातावरण आहे.