बद्रीनाथ धाममध्ये हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले, १० जणांना वाचवण्यात यश

बद्रीनाथ : कामगार मोठ्या संख्येने घटनास्थळी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण बीआरओ कराराखाली काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते. जेव्हा हिमस्खलन झाले तेव्हा सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. हिमालयात तूफान बर्फवृष्टी होत असून सखल भागात पाऊस सुरू झाला आहे. बद्रीनाथ धाममध्ये दोन दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. शुक्रवारी दुपारी बर्फवृष्टीमुळे येथे मोठी दुर्टना घडली. मुसळधार बर्फवृष्टीनंतर हिमनदी फुटली. यामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. आतापर्यंत १० कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. प्रशासन आणि बीआरओ टीमला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, बर्फ पडल्यानंतर ५७ कामगार गाडले गेले. तथापि, १० जणांना वाचवण्यात यश आले आहे.  अपघाताच्या वेळी एका खाजगी कंत्राटदाराचे कामगार मोठ्या संख्येने घटनास्थळी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण बीआरओ कराराखाली काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते. जेव्हा हिमस्खलन झाले तेव्हा सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. त्यापैकी काही जण वाचण्यात जाण्यात यशस्वी झाले, तर ५७ कामगार बर्फात अडकले.