आशुतोषने लखनौच्या जबड्यातून हिरावला विजय

सोलापूर : सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज, फोटो किंवा पोस्ट
व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती
द्यावी, कोणताही अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांशी संपर्क
साधावा, असे आवाहन सोलापूर पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी
केले. पोलीस आयुक्तालयात रमजान ईदनिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत
होते. बैठकीस पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, विजय कबाडे,
महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सारिका आकुलवार यांच्यासह शांतता
समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी आणि मुस्लिम समाजाचे
प्रतिनिधी उपस्थित होते.
शांतता राखण्यासाठी नागरिकांची भूमिका
महत्त्वाची:
पोलीस आयुक्त एम. राज कुमार म्हणाले की, उत्सव
साजरा करताना कायदा आणि सुव्यवस्था राखणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
कोणत्याही परिस्थितीत कोणीही कायदा हातात घेऊ नये. जर कोणी सोशल मीडियावर अफवा
पसरवत असेल किंवा आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करत असेल, तर
नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवावे.
समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन:
बैठकीदरम्यान उपस्थित सदस्यांनी विविध समस्या आणि सूचना मांडल्या.
त्यावर महानगरपालिका आणि इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर
उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
प्रसंगी उपस्थित:
या बैठकीला सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, यशवंत गवारी, सुधीर खिरडकर, राजन माने, आरटीओ अधिकारी, महावितरण
अधिकारी, शहर काझी राफे, मौलाना,
मीना बाजार अध्यक्ष राजू कुरेशी, मकबूल
मोहोळकर, शकील मौलवी, बाबा मिस्त्री
यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.