आशिष शेलारांनी रुग्णालयात जाऊन घेतली सैफ अली खानची भेट
.jpeg)
मुंबई :महाराष्ट्र सरकारचे मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी
रात्री उशिरा लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. याठिकाणी त्यांनी बॉलिवूड
अभिनेता सैफ अली खान याची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वांद्रे पश्चिमेचे भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले की, सैफवर करण्यात आलेल्या या प्राणघातक हल्ल्यात
गंभीर दुखापत झाली आहे, तसेच त्याच्यावर
आतापर्यंत पाच तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली” अशी माहिती त्यांनी दिली
आहे.भेटीनंतर आशिष शेलार यांनी माध्यमांना यासंदर्भातील महत्वाची माहिती
दिली.यावेळी त्यांनी, “सैफला विश्रांतीची गरज आहे. कुटुंबाला
या आघातातून आणि धक्क्यातून सावरण्याची खात्री आपण केली पाहिजे. या घटनेचे राजकारण
करणे अयोग्य आहे.” असे म्हणत विरोधकांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर टीका केली. याच
संदर्भातील सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कायदा आणि
सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते म्हणाले, “मी हे
स्पष्ट करू इच्छितो की ही एक गंभीर घटना आहे. त्याची प्रभावी चौकशी होणे आवश्यक
आहे.”ढे आशिष शेलार म्हणाले, “स्थानिक आमदार असल्याने मला
येथील कायदा आणि सुव्यवस्था चांगली हवी आहे. आमचे सरकार मुंबईची सुरक्षित शहर
म्हणून ओळख कायम राहील याची खात्री करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
स्पष्ट निर्देश दिले आहेत की गुन्हेगाराला कोणत्याही किंमतीत शिक्षा झाली पाहिजे.”
“सुरतमध्ये त्याला सोडले जाणार नाही.भाजप नेते आशिष शेलार यांनी यावेळी, “त्यांनी या घटनेबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. गुन्हेगाराला
पकडण्यासाठी १० पथके तयार करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.