अरविंद केजरीवाल यांचा पराभव; आपसाठी गडही गेले आणि सिंहही गेले दिल्लीत कमळ फुलले; २७ वर्षानंतर भाजपचे कमबॅक

नवी दिल्ली: दिल्लीचे माजी
मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिल्ली विधानसभा
निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आपची अवस्था गड ही गेला आणि सिंहही
गेला अशी अवस्था झाली आहे. दिल्ली
विधानसभा निवडणुकीचा निकाल हा यंदा भाजपच्या बाजूने दिसत आहे. दिल्लीत सत्ता
आणण्यासाठी भाजपने शक्य तो प्रत्येक प्रयत्न केला.तो एग्झिट पोलमध्येही दिसून आला.
अखेर भाजप तब्बल २७ वर्षांनी दिल्लीत सत्ता स्थापन करणार असल्याचं चित्र आहे.
आपसाठी अस्तित्वाची लढाई तर भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या दिल्ली
विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. येथे 'आप'ला मोठा हादरला बसला आहे. लक्षवेधी ठरलेल्या नवी
दिल्ली मतदासरंघात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. या
मतदारसंघात भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांचा विजय झाला आहे. नवी दिल्ली विधानसभा
मतदारसंघात प्रवेश वर्मा यांनी त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला आहे. अरविंद
केजरीवाल यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने प्रवेश वर्मा यांना तर काँग्रेसने
संदीप दीक्षित यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी त्यांच्या राजकीय
कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद
केजरीवाल पराभूत झाले आहेत. त्यांचा भाजपचे प्रवेश वर्मा यांनी त्यांचा ३१८६
मतांनी पराभव केला आहे. नवी दिल्ली विधानसभेची जागा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री
आणि दिल्लीच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये लढली गेली. शेवटी, विजय प्रवेश वर्माला मिळाला. प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री
साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. तर, संदीप दीक्षित हा
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव आहेत. सिसोदिया देखील
हरले अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पक्षाच्या इतर अनेक मोठ्या नेत्यांना
निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मनीष सिसोदिया यांना जंगपुरा
मतदारसंघातूनही पराभव पत्करावा लागला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना
कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्या पराभवाचा धोका आहे. आम आदमी
पक्ष सत्तेत आला तर ते चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील, असे केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी म्हटले होते. यासोबतच त्यांनी मनीष
सिसोदिया यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची घोषणा केली होती. तथापि, पक्षाच्या दोन्ही मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे...तर भाजपला २० जागाही मिळाल्या नसत्या :आमदार रोहित पवार यांची प्रतीक्रिया
दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय
मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! १५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे
मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही
सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २०
जागांच्या वर देखील गेली नसती. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात
सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व
मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या ाशक्ती विरोधात लढताना समान
विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत,
परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब
ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी .