स्काय फोर्स’ मध्ये झळकला सुशीलकुमार शिंदेंचा नातू वीर पहाडिया

सोलापूर :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार यांचा नातू तथा खासदार प्रणिती शिंदे यांचा भाचा वीर पहाडिया याने हिंदी रुपेरी जगतात प्रवेश केला आहे. ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून वीर हिंदी पडद्यावर झळकला आहे. अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्काय फोर्स’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रिलीज झालेला हा चित्रपट वीर पहाडियाचा अभिनेता म्हणून पहिलाच चित्रपट आहे.  चित्रपटात वीर पहाडिया टी विजया ऊर्फ टोडीची भूमिका निभावत आहे. ही भूमिका स्क्वाड्रन लीडर अज्जमदा बोप्पाया देवय्या यांच्या जीवनावर आधारित आहे. १९६५ च्या भारत-पाक युद्धात शत्रूच्या जेट विमानांविरुद्धच्या शौर्याबद्दल आणि प्रतिष्ठित डॉगफाइटसाठी महावीर चक्राने सन्मानित देवय्या यांची आठवण आजही लोकांच्या मनात आहे. देवय्याच्या जीवनातील या भूमिकेचा वीर पहाडियाने सहजपणे अभिनय करत आहे. स्काय फोर्स’मध्ये वीर पहाडियाने अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केले आहे. नवीन अभिनेता म्हणून पहाडियाने अनुभवी अभिनेता अक्षय कुमारसमोर उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याच्या अभिनयाचे समीक्षक आणि प्रेक्षक मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.  हा चित्रपट वीर पहाडियाच्या स्टारडमच्या मार्गावर एक मोठे पाऊल असणार आहे. ‘स्काय फोर्स’ मधील भूमिका आणि त्याच्या अभिनयामुळे, वीर पहाडियाचे नाव चित्रपटसृष्टीत उजळणार आहे.