अनिल अंबानी ED कार्यालयात हजर; १७ हजार कोटींच्या कर्ज फसवणूक प्रकरणी चौकशी

रिलायन्स ADAG समूहाचे प्रमुख अनिल अंबानी आज दिल्लीतील
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कार्यालयात हजर झाले. ही
कारवाई ₹१७,००० कोटींच्या कथित कर्ज
फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित असून, ईडीने त्यांना मनी
लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार समन्स बजावले होते.
या प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या
कंपन्यांमध्ये:
- रिलायन्स
होम फायनान्स लिमिटेड (RHFL)
- रिलायन्स
कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL)
- रिलायन्स
कम्युनिकेशन्स (RCOM)
यांचा समावेश आहे.
या कंपन्यांनी विविध खासगी व सरकारी
बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं, पण त्याचा गैरवापर झाल्याचा
आरोप आहे. ईडीच्या तपासात बनावट कागदपत्रं, शेल
कंपन्यांमार्फत फंड ट्रान्सफर आणि फसवणुकीच्या इतर क्लृप्त्यांचा वापर झाल्याचे
निष्पन्न झाले आहे.
कर्ज थकबाकी तपशील:
- RHFL:
₹5,901 कोटी
- RCFL:
₹8,226 कोटी
- RCOM:
₹4,105 कोटी
या सर्व रक्कमा NPA (Non-Performing Assets) मध्ये वर्ग
केल्या गेल्या आहेत.
प्रमुख कर्जदाता
बँका:
येस बँक, SBI, ICICI, HDFC, अॅक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, यूको बँक, पंजाब
अँड सिंध बँक
ईडी लवकरच बँक अधिकाऱ्यांची चौकशी, कर्ज मंजुरी प्रक्रिया आणि त्यानंतरच्या
कारवाईबाबत माहिती घेणार आहे.
अनिल अंबानी यांच्याकडून अद्याप
कोणताही अधिकृत प्रतिसाद देण्यात आलेला नाही.