अनगर अपर तहसील अखेर रद्द; मुंबई उच्चन्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

मुंबई : मोहोळ तालुक्याच्या राजकारणात कळीचा मुद्दा
ठरलेला अनगर अपर तहसील कार्यालयाचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणी
मुंबई उच्चन्यायालयाने सोमवारी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. अनगर अप्पर तहसील संदर्भात महाराष्ट्र शासनाने 24 जुलै
2024 रोजी काढलेला GR सोमवारी मुंबई येथे उच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायाधीश यांनी रद्द केला. याशिवाय जमीन महसूल संहिता सेक्शन ४ याचे पालन न
केल्याने अनगर अप्पर तहसील हे रद्दबातल केल्याचे स्पष्ट केले. भविष्यात अशा
पद्धतीने जर कार्यालयाची निर्मिती करायची असेल तर विहित प्रचलित कायद्याचे पालन
करावे असे कोर्टाने नमूद केल्याचे याचीकाकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.