अमरनाथ यात्रा सुरू; पहिल्या दिवशी हजारो भाविकांचे आगमन, 580 कंपन्यांचा सुरक्षा बंदोबस्त

जम्मू / श्रीनगर : अमरनाथ यात्रा आजपासून (३ जुलै) औपचारिकपणे सुरू झाली असून पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी सहभागी होत बाबा बर्फानीचे दर्शन घेतले. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी पहाटे जम्मूहून निघणाऱ्या पहिल्या यात्रेकरूंच्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. संचार पहिल्या तुकडीत 5892 भाविकांचा समावेश होता. यामध्ये १,११५ महिला, ३१ मुले आणि १६ ट्रान्सजेंडर भाविकही सामील झाले होते. पहाटे ४.३० वाजता यात्रेची सुरुवात झाली. कश्मीरच्या बालटाल बेस कॅम्पमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली असून येथे ३००० पेक्षा अधिक तंबू उभारण्यात आले आहेत. या तंबूंमध्ये राहून भाविक पहाटे लवकर यात्रा सुरू करतात. संचार अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त यात्रेपूर्वी पहलगाम हल्ला घडल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या 580 कंपन्या यात्रेच्या मार्गावर तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा सर्वात मोठा बंदोबस्त मानला जात आहे. अमरनाथ यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे या पवित्र यात्रेत देशभरातून हजारो भाविक सहभागी होणार आहेत. प्रशासनाने भाविकांसाठी राहण्याची, वैद्यकीय सुविधा, वाहतूक आणि तांत्रिक मदतीची विशेष तयारी केली आहे.संचार