मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात सर्व आरोपी निर्दोष; फुले चौकात तणाव

मालेगाव, :- साली मालेगाव येथे
झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज जाहीर झाला. एनआयए विशेष न्यायालयाने
या खटल्यातील सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्तता दिली आहे. न्यायालयाच्या
निर्णयानंतर हिंदू संघटनांनी जल्लोष साजरा केला, मात्र फटाके
फोडण्यावरून फुले चौक परिसरात तणाव निर्माण झाला. फुले चौकात गोंधळ फुले चौक येथे
काही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते फटाके फोडण्याचा आग्रह धरत होते. सार्वजनिक
शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी यास विरोध केला. यामुळे हिंदू
संघटनांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक व थोडीफार झटापट झाली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या
परिसरात तणावाचे वातावरण आहे, पण पोलिसांच्या तत्परतेमुळे
परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनेचा पार्श्वभूमी २९ सप्टेंबर २००8 रोजी मालेगावच्या मुस्लीमबहुल भागातील धार्मिक स्थळाबाहेर एका
दुचाकीमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात ६ नागरिकांचा मृत्यू आणि १०० पेक्षा अधिक
लोक जखमी झाले होते. प्राथमिक तपास ATS ने तर पुढे NIA
ने केला. या प्रकरणात पहिल्यांदाच हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग
झाल्याने मोठा राजकीय गदारोळ झाला होता. न्यायालयाने आता या प्रकरणातील साध्वी
प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह ७
जणांना पुराव्याअभावी निर्दोष ठरवले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी
नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.