अजित पवार यांची प्रकृती बिघडली; सर्व नियोजीत कार्यक्रम केले रद्द

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडल्याचे
सांगण्यात येत आहे. प्रकृती
अस्वास्थ्यामुळे अजित दादा यांचे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
अजित दादा यांचे कार्यक्रम रद्द झाल्याने संयोजक हिरमुसले आहेत. अजित पवार यांनी
रविवारी नाशिकमध्ये आमदार सरोज आहेर यांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
त्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खराब झाली होती. रविवारी नाशिकमध्ये केलेल्या
भाषणात अजित पवार यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर
त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करत पुण्याला आले होते. मात्र रात्री उपचार
घेतल्यानंतरही त्यांना बरे वाटत नसल्याने त्यांनी आजचे - सोमवारचे सर्व कार्यक्रम
रद्द केले आहेत. यामुळे पुण्यातील औंध येथील आयटीआय मधील प्रशिक्षकांच्या
प्रशिक्षणासाठी आयोजित कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहू शकणार नाहीत.