अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आता 'मिशन दिल्ली'

दिल्ली निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी
काँग्रेसनेही निवडणुकीचा बिगुल बिगुल वाजवला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या
उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक तारखा जाहीर होण्याआधीच
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्लीतील आगामी विधानसभा
निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ११
उमेदवारांची नावे आहेत. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांच्याविरोधात
पक्षाने मुलायम सिंह यांना बदलीमधून तिकीट दिले आहे. याशिवाय बुरारीमधून रतन
त्यागी, चांदनी चौकातून खालिद उर रहमान, बल्ली मारनमधून
मोहम्मद हारुण आणि ओखलामधून इम्रान सैफी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
छतरपूरमधून नरेंद्र तंवर, लक्ष्मी नगरमधून नमाहा, गोकुळपुरीतून जगदीश भगत, मंगोलपुरीतून खेम चंद,
सीमापुरीतून राजेश लोहिया आणि संगम विहारमधून कमर अहमद यांना
उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण ७० जागा असून
फेब्रुवारीमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर
होण्यास बराच कालावधी आहे. पण आधीच पक्षाने सर्व उमेदवार जाहीर केल्या आहेत. विशेष
म्हणजे राष्ट्रवादीच्या यादीत चार मुस्लीम उमेदवारांनाही स्थान देण्यात आले आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आम आदमी
पक्षाने ७० जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, तर काँग्रेसने पहिल्या यादीत ४७ जागांसाठी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत
२६ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्याचबरोबर भाजपही आपल्या उमेदवारांची यादी लवकरच
जाहीर करू शकते. नावे जाहीर करण्यापूर्वी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची
बैठक झाली. या बैठकीत ३५ जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. मात्र,
२६ जागांवर केवळ उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली. उर्वरित
९ जागा सध्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. त्याही लवकरच जाहिर होतील.