मध्यप्रदेशात हवाई दलाच्या विमानास अपघात; दोन्ही पायलट सुखरूप

भोपाळ: मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील बहरेता सानी गावाजवळ हवाई दलाचे लढाऊ विमान मिराज-२००० कोसळले. दुपारी २.४० च्या सुमारास हा अपघात झाला. या विमानाने ग्वाल्हेरहून उड्डाण केले होते. या विमानात दोन पायलट होते. अपघातापूर्वी दोन्ही वैमानिकांनी स्वतःहून बाहेर पडून स्वतःला वाचवले. दोघेही सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.  घटनेची माहिती मिळताच, हवाई दलाचे पथक विशेष हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही वैमानिकांना ग्वाल्हेरला घेऊन गेल्याचे वृत्त संस्थेने म्हटले आहे. या घटनेनंतर हवाई दलाकडून अपघाताच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.