ऊस उत्पादकांसाठी तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन; एकरी उत्पादन वाढवण्यावर भर

अकलूज :– सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर
कारखाना, शंकरनगर-अकलूज येथे ऊस विकास कार्यक्रमांतर्गत आज, १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांसाठी
कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित तंत्रज्ञान कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह शंकरराव
मोहिते-पाटील, कारखान्याचे चेअरमन मा. श्री. जयसिंह शंकरराव
मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मा. स्वरूपाराणी
जयसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली. कार्यशाळेमध्ये
ॲग्रीकल्चरल ट्रस्ट, बारामती अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राचे
मृदा शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी मार्गदर्शन करताना, एकरी
ऊस उत्पादन वाढविण्यासाठी AI आधारित नवतंत्रज्ञानाचा उपयोग
कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या तांत्रिक
प्रश्नांचे निरसनही करण्यात आले. सदर कार्यक्रमाला कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील
शेतकरी, ऊस उत्पादक सभासद तसेच स्थानिक पत्रकार मोठ्या
संख्येने उपस्थित होते.